ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : लँडिंगदरम्यान अजित पवारांच्या विमानाचा अपघात, काहीजण जखमी

बारामती : वृत्तसंस्था

बारामती येथे लँडिंगदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात विमानातील काहीजण जखमी झाल्याचे वृत्त असून, अजित पवार हेही गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर संबंधित विमान एका शेतात कोसळले असून त्यातून धुराचे मोठे लोट उठताना दिसून आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी हा अपघात झाला. आज बारामती तालुक्यात अजित पवार यांच्या चार प्रचारसभा नियोजित होत्या. मात्र, लँडिंगदरम्यान झालेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती अजित पवारांचे निकटवर्तीय तसेच पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रणजीत शिवतारे यांनी दिली आहे. अपघाताची सविस्तर कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसून, पोलीस व संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमींची नेमकी ओळख व प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!