मेष
कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. मेहनतीचे कौतुक होईल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. पैशांशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या.
वृषभ
मेहनतीचे चांगले फळ मिळेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी राहतील. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. अनावश्यक खर्च टाळा.
मिथुन
काहीतरी नवीन करण्याची इच्छा होईल. नोकरीत नवीन लोकांशी ओळख होईल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. जुन्या मित्राकडून आनंदाची बातमी मिळू शकते.
कर्क
प्रत्येक काम विचारपूर्वक करणे गरजेचे आहे. ऑफिसमध्ये एखाद्या गोष्टीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. घरातील खर्च वाढण्याची शक्यता असल्याने बजेटचे नियोजन करा.
सिंह
आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळण्यासह आर्थिक बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
कन्या
रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत नवीन जबाबदारी, तर व्यवसायात नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. पैशांचे व्यवहार करताना घाई करू नका.
तूळ
आजचा दिवस आनंददायी ठरेल. ऑफिसमध्ये कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळेल. जोडीदार आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
वृश्चिक
ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलताना संयम ठेवा. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. कौटुंबिक विषयांवर समजूतदारपणे चर्चा करा.
धनु
कामाच्या ठिकाणी धावपळ वाढू शकते, पण त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील. नोकरीत पुढे जाण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल.
मकर
कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. योग्य नियोजन केल्यास सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करता येतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरेल..
कुंभ
नवीन कल्पना सुचतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न कराल. नोकरीत बदल किंवा नवीन जबाबदारीबाबत चर्चा होऊ शकते. कोणालाही पैसे उधार देताना काळजी घ्या.
मीन
सर्जनशील कामांकडे अधिक कल राहील. नोकरीत कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. व्यवसायात नवीन मार्ग खुले होऊ शकतात. मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी विचार करा.











