---Advertisement---

पोलीस भरतीच्या उमेदवारांना मोठा दिलासा; मैदानांवर आता मोफत सराव!

Follow Us:
---Advertisement---

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भरतीपूर्व सरावासाठी आता महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींची मैदाने विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाने शासन परिपत्रक जारी केले आहे.

या निर्णयामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. यापुढे सरावासाठी मैदान वापरताना कोणतेही भाडे, वापरशुल्क, प्रवेशशुल्क किंवा अनामत रक्कम आकारता येणार नाही.

पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मैदानी चाचणी पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. विशेष म्हणजे, पहाटे ५ ते सकाळी ९ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत सरावासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

केवळ मैदान उपलब्ध करून देण्यापुरताच हा निर्णय मर्यादित नसून उमेदवारांसाठी आवश्यक सुविधाही पुरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, बदलकक्ष, प्रकाशव्यवस्था आणि प्राथमिक उपचार सुविधांचा समावेश आहे.

राज्यातील हजारो तरुण पोलीस भरतीसाठी मेहनत घेत आहेत. अनेक ठिकाणी मैदानावर सराव करण्यासाठी उमेदवारांना पैसे मोजावे लागत होते. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे त्यांचा सरावाचा मार्ग अधिक सोपा होणार असून आर्थिक अडचणीही कमी होणार आहेत. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी हा निर्णय मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!