---Advertisement---

न्यायालयाच्या गेटवरच रक्तरंजित हल्ला; गोळी चुकली, कोयत्याने संपवले!

Follow Us:
---Advertisement---

पुणे, वृत्तसंस्था : पुणे न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. एका हत्या प्रकरणातील आरोपीवर पाच ते सहा जणांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी आधी गोळीबार केला; मात्र निशाणा चुकल्यानंतर कोयत्याने सपासप वार करत त्याची हत्या केली. वर्दळीच्या न्यायालय परिसरात घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे न्यायालयाला बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळत असतानाच न्यायालयाबाहेर प्रत्यक्ष हल्ल्याची घटना घडली. शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी न्यायालयात आला असताना गेट क्रमांक ४ बाहेर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. पाच ते सहा हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य करत गोळीबार केला. गोळी निशाण्यावर न लागल्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने वार केले. या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत काही अन्य व्यक्तीही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळी बंदूक फेकून देत पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. न्यायालयासारख्या वर्दळीच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील परिसरात हा हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी आणखी एक गंभीर दावा केला आहे. हल्ल्यानंतर मदतीसाठी १०० आणि १०८ क्रमांकावर फोन करण्याचा प्रयत्न केला; मात्र फोन लागले नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आल्याची माहिती आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून, हल्ल्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!