---Advertisement---

सेवानिवृत्ती निमित्त गंगाधर कोरे यांचा सत्कार

Follow Us:
---Advertisement---

वळसंग – दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील गणित व विज्ञानाचे शिक्षक गंगाधर कोरे पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले.त्यांचे संस्था व प्रशालेतर्फे शाल श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य वीरेश थळंगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सदस्य रमेश दुधगी, सहशिक्षक तानाजी जमादार सूर्यकांत शिवशरण, संजय धनशेट्टी हे उपस्थित होते.

५ सप्टेंबर १९८६ पासून ३१ मार्च १९९७ पर्यंत गंगाधर कोरे यांचे अध्यापन कार्याला उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील जी. बी. घोडके प्रशाला येथून सुरुवात झाली. त्यानंतर ते १ एप्रिल १९९७ पासून वळसंगच्या शंकरलिंग प्रशालेत गणित व विज्ञान विषयाचे अध्यापक म्हणून काम करत ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले.

याप्रसंगीअष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे गंगाधर कोरे सर यांचे सेवानिवृत्तीनंतर चे जीवन सुखाचे ,समृद्धीचे व भरभराटीचे जावो तसेच त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशा भावना कलाशिक्षक सूर्यकांत शिवशरण, श्रीमंत भोसले , नीलप्पा कवटगी, विजयालक्ष्मी थळंगे आदींनी त्यांच्या विषयी आपल्या मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना गंगाधर कोरे त्यांच्या शालेय अध्यापन जीवनातील अनेक प्रसंग शिक्षकांपुढे व्यक्त केले. प्रत्येक अडचणींना कोणत्या पद्धतीने तोंड द्यायला पाहिजे. आणि कशा पद्धतीने सोप्या भाषेत गणित आणि विज्ञान शिकवले पाहिजे या विषयी सत्काराला.

उत्तर देताना गंगाधर कोरे यानी व्यक्त केले.
वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील संजय कुमार धनशेट्टी, सिद्धाराम भैरामडगी, संतोष शिंदे ,सिद्धारूढ हिरेमठ, संतोष कस्तुरे, गंगाधर बिराजदार, बसवराज दुधगी,वीरेश थळंगे, गंगा बागलकोटी, स्नेहा हळगोदे, राजश्री दुधगी, गौरीशंकर चनशेट्टी, इरप्पा केशेट्टी, कट्टेप्पा कोळी, विनोद दुधगी आधी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी जमादार यांनी केले तर आभार बाळकृष्ण गुंड यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!