---Advertisement---

बळोरगी कुटुंबीयाचे आमदार प्रणिती शिंदे यांनी केले सांत्वन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.७ : काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी यांचे लहान बंधू मोहिन बळोरगी आणि भाऊजी मैनुद्दीन पटेल यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले होते.त्यामुळे आज काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे व आमदार प्रणितीताई
शिंदे यांनी अक्ककोट येथे अशपाक बळोरगी यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

कोरोनामुळे दोघांचे निधन होऊन बळोरगी कुटुंबाची मोठी हानी झाली आहे.त्यांच्या दुःखात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तसेच आम्ही सहभागी आहोत,अशा प्रकारची भावना ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.

यावेळी एजाज बळोरगी,फारूक बबरची, मुस्तफा बळोरगी,अली बळोरगी, नोमान बळोरगी आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!