---Advertisement---

जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार कालबद्ध पदोन्नतीचा लाभ

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्यांना सातवा वेतन आयोगानुसार कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे.  यासाठी जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना गेल्या २०१६ पासून संघर्ष करत होती. आज कर्मचारी संघटनेच्या एकजुटीमुळे जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्यांना कालबद्ध पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाकडून आरोग्य कर्मचार्यांना कालबद्ध पदोन्नती लागू झाल्याचे आदेश निर्गमित झाल्याने जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वाय. पी. कांबळे यांनी अनेक वर्षांपासून कालबद्ध पदोन्नतीसाठी प्रशासना बरोबर संघर्ष करताना दिसत होते. वेळोवेळी निवेदन, मोर्चा,  उपोषण करुन ही कर्मचार्यांना पदोन्नतीचा लाभ मिळत नसल्याने कर्मचार्यांमध्ये संताप व्यक्त होत होता. अखेर २४ जून २०२१ रोजी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून आरोग्य कर्मचार्यांना कालबद्ध पदोन्नती लागू झाल्याचे आदेश पारित झाल्याचे जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वाय पी कांबळे यांनी सांगितले.

कालबद्ध पदोन्नतीचा आदेश लागू झाल्याने सोलापूर जिल्हा परिषद सर्व संवर्गीय आरोग्य कर्मचार्‍यातून समाधान व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात ८० टक्के जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्यांना सातवा वेतन आयोगानुसार कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला होता. परंतु सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी मात्र या कालबद्ध पदोन्नती पासून वंचित होते. सन २०१६ पासून जिल्हा परिषद मध्ये अनेक अधिकारी बदलून आले, परंतु आरोग्य कर्मचार्‍यांच्या कालबद्ध पदोन्नतीची फाईल मात्र पुढे जाताना दिसत नव्हती.

यासाठी संघटनेकडून संबधित अधिकाऱ्या बरोबर वादविवाद, संघर्ष सुरुच होता. शेवटी २४ जून २०२१ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्या बरोबर झालेल्या बैठकीत मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या ठोस निर्णयामुळे जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्यांचा कालबद्ध पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाल्याचे जिल्हाध्यक्ष वाय पी कांबळे यांनी सांगितले. खूप दिवसांपासून आरोग्य कर्मचार्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्यांच्या चेहर्‍यावर उत्साह संचारल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

प्रलंबित विषय अनेक वर्षानंतर मार्गी लागल्याने सोलापूर जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेच्यावतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी, आमदार संजय मामा शिंदे, आमदार प्रणितीताई शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बबनदादा शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आरोग्य समिती सभापती दिलीप चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव, अविनाश गोडसे, युनियन नेते विवेक लिंगराज व जिल्हा परिषद आरोग्य संघटना पदाधिकारी आदींचे आभार व्यक्त करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!