---Advertisement---

राज्यात महायुतीला धक्का : माढा मतदार संघात ‘तुतारी’ आघाडीवर !

By team
On: June 4, 2024 1:08 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून देशात मोदी सरकारला पुन्हा एकदा संधी मिळताना दिसत आहे मात्र राज्यात महायुतीला जनतेने नाकारल्याचे चित्र असून महाविकास आघाडीचे उमेदवार देखील आघाडीवर आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे दुसऱ्या फेरीत ही आघाडीवर असून, त्यांना 8 हजार 446 मतांची आघाडी मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माढा लोकसभा मतदारसंघातील दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना 48 हजार 14 तर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 39 हजार 568 मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीत ही मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत. तर तिसऱ्या स्थानावर रामचंद्र घुटुकडे हे असून, त्यांना 4 हजार 583 मते मिळाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!