गर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस – अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मुंबई, दि. 29 : गर्भपाताकरिता वापरात येणाऱ्या औषधाची Medical Termination of Pregnancy Kit (MTP) KIT) ऑनलाईन विक्री होत असल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने तपासणीकरिता विशेष मोहिम राबविण्यात आली. प्रशासनाने एकूण 34 ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेबाबत पडताळणी केली. त्यानुसार अॅमेझॉन या संकेतस्थळावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून मागणी नोंदविली. त्यानुसार डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या औषधाची मागणी दोन … Read more

साडे चार लाखांचा अवैध तांदूळ पकडला, अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याची कामगिरी

अक्कलकोट : कर्नाटकातून उमरग्याकडे अक्कलकोटमार्गे जात असलेला तांदळाचा ट्रक संगोगी (ता. अक्कलकोट) गावच्या अलीकडील पुलावर पोलिसांनी सापळा रचून पकडला. दहा लाखाच्या ट्रकसह चार लाख ५८ हजारचा तांदूळ असे सुमारे १४ लाख ५८ हजार रुपयांचे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.याची दक्षिण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, याची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय … Read more

प्रलंबित ॲट्रॉसिटी गुन्ह्यांचा तपास त्वरित करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे निर्देश

सोलापूर,दि.27: अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (ॲट्रॉसिटी ॲक्टी) प्रलंबित गुन्ह्यांचा तपास त्वरित करून पिडीतांना लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, विशेष सरकारी अभियोक्ता यासंदर्भातील आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला पोलीस उपायुक्त संजय साळुंखे, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, अशासकीय सदस्य मुकुंद … Read more

राष्ट्रीय लोकअदालतीचे एक ऑगस्टला आयोजन

सोलापूर, दि.27 : राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे होणारी राष्ट्रीय लोकअदालत 1 ऑगस्ट 2021 होणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर. देशपांडे यांनी दिली आहे. एक ऑगस्ट रोजी शहर व जिल्हा, तालुक्यातील सर्व न्यायालयात फौजदारी तडजोडपात्र, बँक वसुली, कलम 138 एनआय ॲक्ट, अपघात न्यायाधिकरण, कामगार वाद, वीज, पाणी … Read more

पॉर्न व्‍हिडिओ रॅकेट प्रकरणी उद्योगपती राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : पॉर्न व्‍हिडिओ रॅकेट प्रकरणी सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती उद्योगपती राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे. वेबसिरीजमध्ये काम देण्याचे आमीष दाखवून तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत त्यांच्या अश्‍लील चित्रफीती बनवून त्या वेबसाईट आणि अँपच्या माध्यमातून प्रसारीत केल्याच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रा याला सोमवारी रात्री अटक केली होती. … Read more

उद्योगपती राज कुंद्रा यांना “या” कारणामुळे मुंबई पोलिसांनी केली अटक…

मुंबई : हिंदी सिनेमा श्रुष्टीतील नामवंत सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी … Read more

टी-सिरीजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई : चित्रपट सृष्टीतील विश्वविख्यात कंपनी, कॅसेटकिंग गुलशन कुमार यांचे चिरंजीव टी सिरीजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तीस 30 वर्षीय महिलेने त्यांच्या विरोधात अंधेरी येथील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या महिलेला आपल्या कंपनीत काम देण्याच्या आमिषाने भूषण कुमार यांनी बलात्कार केल्याची तक्रार … Read more

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्यायामसाठी दररोज “काय” खेळतो ?..

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ठणठणीत असल्याचे माहिती त्याचा भाऊ इक्बाल कासकरने केंद्रीय यंत्रणाच्या चौकशीत सांगितले आहे. दाऊद इब्राहिम व्यायामासाठी रोज बॅडमिंटन खेळतो असेही त्यांनी सांगितले आहे. दाऊद इब्राहिमला दुर्दर आजार जडल्या असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याच्या बातमी निव्वळ अफवा आहेत असेही त्यांने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील हे … Read more

कलादिग्दर्शक राकेश साप्ते आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक

पुणे : कलादिग्दर्शक राकेश साप्ते यांच्या आत्महत्ये प्रकरणातील मुख्य आरोपीचा मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. कलादिग्दर्शक राकेश साप्ते यांनी ३ जुलै रोजी पुण्याच्या वाकड परिसरातील त्यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकारणातील मुख्य आरोपी राकेश मौर्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरच्या पिंपरी परिसरातील एका हॉटेलमध्ये आला असता त्याला अटक करण्यात आली आहे. या … Read more

साडेसात लाखाची लाच घेणार्‍या सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह दोघांना पकडले; हद्दीच्या बाहेर लाचखोरी, पोलीस आयुक्तालयात खळबळ

सोलापूर, (प्रतिनिधी)ः- गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला मदत करतो म्हणून आरोपीकडून साडेसात लाखाची लाच घेताना सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाला रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवार दि. 9 जुलै रोजी झाली. पोलीस निरीक्षक संपत नारायण पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे (रा. सोलापूर) असे दोघा लाचखोर पोलीस अधिकार्‍यांची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती … Read more