---Advertisement---

पुणे सोलापूर महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात, ४ ठार, २० गंभीर जखमी

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : पुण्यातील चौफुला येथे पुणे सोलापूर मार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये तीन पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला. जखमी असलेल्या काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एक लक्झरी बस आज पहाटेच्या सुमारास सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येत होती. याच वेळी चौफुला ओलांडल्यानंतर वाखारी हद्दीत एका ट्रकचा टायर फुटल्याने तो ट्रक महामार्गावरच उभा करण्यात आला होता. या उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज लक्झरी बस चालकाला आला नाही. यामुळे बस थेट ट्रकला जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की बसच्या एक बाजूचा चक्काचूर झाला.

या अपघात पुणे पोलिस दलातील तीन कर्मचाऱ्यांचा आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर २० हून अधिक जन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना यवत आणि केडगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. तर काही जखमींना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!