---Advertisement---

किणी येथे तालुकास्तरीय प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील किणी येथे तालुकास्तरीय प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते करण्यात आले.उपसरपंच अमोल हिप्परगे यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आला आहे.पाहिले बक्षीस १ लाख १ हजार,दुसरे बक्षीस ५१ हजार रुपये व
चषक असे आहे.या स्पर्धेत एकूण बारा संघांनी सहभाग घेतला आहे.यावेळी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,उपाध्यक्ष महेश माने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, सरपंच उमेश पाटील,सिद्धार्थ गायकवाड,अशपाक अगसापुरे,शेकप्पा कलकूटगे, सहदेव कोटमाळे ,बाबन जमादार, शंकर व्हनमाने, उमाकांत गाढवे, व्यकंट मोरे,दत्तात्रय मुनाळे,इस्माईल जमादार,मल्लिकार्जुन होटगे ,संजय बानेगाव आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक अमोल हिप्परगे यांनी केली.याप्रसंगी रविकांत तुपकर,सिद्धाराम म्हेत्रे,बळीराम साठे यांनी मनोगत व्यक्त केले आणि हिप्परगे यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमास किणी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक जाधव,विजय घिवारे,संजय किणीकर,मनोज जाधव,संतोष अंबाडे, शेखर सोनकांबळे, रुद्रामनी स्वामी,शिवानंद बिराजदार,नितीन व्हनमाने ,शरण राचेटी, अंगद देडे,अमीन बावासे, धीरज चनशेट्टी,विजय मठ आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कोटमाळे यांनी केले तर आभार रत्नशील सोनकांबळे यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!