---Advertisement---

हिंदीच्या शोसाठी मराठी चित्रपटाचे शो उतरवले…; संजय राऊत संतापले !

By team
On: July 25, 2025 5:11 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही महिन्यापासून हिंदी मराठी वाद सुरु असतांना आता  ‘सैयारा’ हा चित्रपट सुपरहिट ठरत आहे. यातील प्रेमकहाणीने तरुण वर्गाला अक्षरश: वेड लावले आहे. अनीत पड्डा आणि आणि अहान पांडे यांच्या अभिनयाने कमाल केली. देशभरातून दोघांच्याही अभिनयाचे कौतुक केले जात आहे. प्रेक्षक भावुक होऊन ढसाढसा रडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड करत असून, कमाईचे आकडे देखील दिवसेंदिवस वाढतच आहेत.

मात्र, आता याचा फटका मराठी सिनेमाला बसला असल्याचं पाहायला मिळत आहे. हिंदी चित्रपटांच्या दादागिरीमु‍ळं मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये मराठी चित्रपटांना नेहमीच झुकतं माप देण्यात येतं, हे काही पहिल्यांदा घडत नाहीये. ‘सैयारा’ सिनेमासाठी ‘येरे येरे पैसा ३’ या मराठी चित्रपटाचे शो उतरवण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानं आता संताप व्यक्त केला जातोय.

उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील आता या संदर्भात ट्विट करत भाष्य केलंय. मराठीसाठी सगळे एकत्र येत आहेत, लढत येत आहेत तरीही प्रश्न काही संपत नाहीत, सैयारा या हिंदी चित्रपटास थिएटर मिळावे म्हणून- “येरे येरे पैसा ३”या मराठी चित्रपटास उतरवण्यात आले, हे नेहमीचेच झाले आहे, मराठीचा लढा अधिक तीव्र करावा लागेल, मराठीचे खरे मारेकरी वेगळेच आहेत जय महाराष्ट्र! असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!