---Advertisement---

खळबळजनक : तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरण थेट सोलापूरपर्यत ?

By team
On: June 23, 2025 3:12 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील ड्रग्ज तस्करीच्या चर्चा सुरु असतांना आता तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा पोलिस तपास वेगाने होताना दिसत आहे. तामलवाडी पोलिसांनी अलीकडेच सोलापूरमधून भाजप कार्यकर्ता जीवन साळुंकेला अटक केली होती. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर याला देखील ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. वास्तविक तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाची दोषारोपपत्रात संतोष कदमचे नाव समाविष्ट होते. मात्र, त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली नव्हती.

14 फेब्रुवारी रोजी तामलवाडी येथून 45 ग्रॅम ड्रग्जसह तिघांना ताब्यात‎ घेतल्यानंतर ड्रग्जचे मोठे रॅकेट ‎उघडकीस आले होते. ड्रग्जचे धागेदोरे‎ मुंबई, पुण्यासह सोलापूरपर्यंत ‎असल्याचे तपासात निष्पन्न झाले ‎होते. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची‎ संख्या 35 वर गेली असून यापैकी 22 आरोपींना गजाआड करण्यात‎ पोलिसांना यश आले आहे. इतर आरोपी अद्याप फरार आहेत.‎ दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात शहरातील‎ अनेक प्रतिष्ठित मागील दोन‎ महिन्यांपासून फरार आहेत.

तुळजापुरात राज्यासह इतर ‎ठिकाणाहून दर्शनासाठी येणाऱ्या ‎भाविकांची संख्या मोठी आहे.‎ त्यातून तरूणांचा हातात सहज पैसा‎ मिळतो. या ड्रग्जमध्ये तरूणाई‎ अडकली आहे आणि याचाच‎ लाभ घेत तस्करांनी तरूणाई हीच‎ मोठी ग्राहक बनल्याचे शहरातील ‎जाणकारांचे म्हणणे आहे. 2 ते 3‎ हजार रूपये प्रती ग्रॅमने शहरात‎ ड्रग्जची विक्री होते. ज्यांच्याकडे ‎पैसा तोच ग्राहक झाला. शुक्रवार ‎पेठेतील बोंबल्या चौक, हडको, ‎वेताळनगर, शेख फरीद या‎भागातून विक्री होत असल्याचे‎ सांगण्यात येते. विक्री करणाऱ्यांची ‎ओळख कुणाकडेही नाही.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी असल्याचे समोर आले आहे. मात्र त्यातील काही आरोपी अद्याप फरार आहे. त्यामुळे या फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे हे ही पोलिसांपुढाचे आव्हान असणार आहे. दरम्यान आता या ड्रग्ज तस्करी प्रकरण तुळजाभवानी मंदिरापर्यंत पोहचल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून यात पुजाऱ्यांचा ही सहभाग असल्याचे बोलले जात आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!