---Advertisement---

सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांच्या पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर  : सोलापूरचे जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांच्या, ‘मी पत्रकार अरविंद जोशी : जसा घडलो तसा’ या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन बुधवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शिवस्मारक सभागृह, शिंदे चौक सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि जेष्ठ साहित्यिक संशोधक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोलापूरच्या सुयश गुरुकुलाचे संस्थापक प्राध्यापक केशव शिंदे हे भूषवणार असून औरंगाबाद येथील पत्रकार लेखक दत्ता जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन सोलापूरच्या जटायु अक्षरसेवा या प्रकाशन संस्थेतर्फे करण्यात येत आहे. तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!