---Advertisement---

टेम्पोची पादचाऱ्यांना जबर धडक : दोन ठार दोन जखमी

By team
On: June 11, 2024 10:11 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच महाडमध्ये भरधाव टेम्पोने रस्त्यावरून जात असलेल्या चार पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली आहे. यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अज्ञात वाहनाला टेम्पोची धडक बसली. यात टेम्पोच्या कॅबिनचा चुराडा झाला आहे. कॅबिनमध्ये अडकलेल्या चालकदेखील जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होतं. मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती हे महाड एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होते. सोमवारी रात्रपाळीसाठी चौघेही कामावर निघाले होते. रस्त्यावरून पायी जात असताना काळीजकोंड परिसरात एका भरधाव टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली शत दोघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!