टोकियो : भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले आहे. आज (रविवार) खेळल्या गेलेल्या (बॅडमिंटन) कांस्यपदकाच्या सामन्यात तिने जागतिक क्रमवारीत ९ व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या बिंग जिओचा २१-१३, २१-१५ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला.
२६ वर्षीय सिंधूचे ऑलिम्पिकमधील हे दुसरे पदक आहे. यापूर्वी तिने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. यासह सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी दुसरी भारतीय बनली आहे.
पहिल्यांदा सिंधूने चांगली सुरुवात केली. तिने ४-० अशी आघाडी घेतली. यानंतर, बिंग जिओने पुनरागमन केले. तिने ५-५ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सिंधूने शानदार शॉट्ससह ११-८ अशी आघाडी घेतली. सिंधूने ही आघाडी कायम राखली आणि पहिला गेम २३ मिनिटांत जिंकला. २१-१३ असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्येही सिंधूने आक्रमक खेळ केला. दुस-या गेमध्या मध्यांतरापर्यंत तिने ११-८ अशी आघाडी घेतली. मात्र, चीनच्या खेळाडूने सलग तीन गुण मिळवून ११-११ अशी बरोबरी साधली. यानंतर सिंधूने सलग चार गुण घेत १५-११ अशी आघाडी घेतली केला. अखेरीस सिंधूने दुसरा गेम २९ मिनिटांत जिंकून कांस्यपदकावर नाव कोरले.