---Advertisement---

मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; शिंदेंच्या मंत्र्यांची टीका !

By team
On: June 19, 2025 3:22 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचा काय भलं करणार आहेत? असा सवाल संजय राऊतांनी विचारला. त्यावर आता शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.

संजय शिरसाट यांनी नुकताच एका माध्यम समूहाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांसह शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंवर टीका केली. संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं, असा सवाल संजय शिरसाट यांनी केला आहे.

“भरत शेट गोगावले हे पूजा पाठ करणारे आहेत हे महाराष्ट्राला कळालं. अघोरी पूजा अशी कॅमेऱ्यावर होत नाही. ती बंद खोलीत, जंगलात होते. हे मदारीचे खेळ बंद करावेत.. जे टीका करतात त्या संजय राऊतला कळायला पाहिजे. मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण संजय राऊतांनी सांगावं. त्याची पण मीडियाने माहिती घ्यावी, कारण मातोश्रीवर रोज एका बंगाली बाबाचा वावर असतो. तो यांना सांगतो आज काय करायचं, काय नाही. आजकाल उद्धव ठाकरे त्यांचं जास्त ऐकतात. मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते शोधा”, असे संजय शिरसाट म्हणाले.

“आम्ही बाळासाहेबांचं ज्वलंत हिंदुत्व घेऊन पुढे जात आहोत. उद्धव साहेबांनी शिवसेनेची काँग्रेस केली आहे. त्यांना बाळासाहेबांच्या वक्तव्याचा विसर पडला आहे. एकनाथ शिंदे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्या पक्षात प्रवेशासाठी रांगा लागल्या असून, प्रवेशासाठी तारखा ठरवाव्या लागत आहेत”, असे संजय शिरसट यांनी म्हटले.

राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबाबत उद्धव ठाकरे सध्या काहीही बोलणार नाहीत, कारण त्यासाठी आवश्यक असलेला संवाद दोघांमध्ये नाही, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले. हिंदुत्व ही आपली विचारधारा असून, शिंदे साहेब यापूर्वीच राज ठाकरे यांना भेटले आहेत. भविष्यात काहीतरी सकारात्मक घडेल अशी आम्हाला आशा आहे, असेही ते म्हणाले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!