---Advertisement---

सोलापुरात नेत्र व दंत रोग तपासणी शिबिर

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर – सोलापूर सोशल फाउंडेशन, सोलापूर डेंटल मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, सोलापूर लायन्स क्लब, सोलापूर चॅरिटेबल ट्रस्ट, ब्रिजमोहन फोफलिया नेत्रालय तसेच इंचगिरी महाराज मठ संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २१ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या मोफत नेत्र व दंत रोग तपासणी शिबिरात 50 जणांची तपासणी करण्यात आली.

विजापूर रोडवरील इंचगिरी मठात हे शिबिर पार पडले. त्यात डॉ. आशितोष सुतार, डॉ. आदित्य कुलकर्णी, डॉ. अक्षय शिराळ यांनी लोकांची दातांची तपासणी केली. त्याचबरोबर सचिव आसद सैफन, डॉ. शिवाजी पाटील यांचे टीम ने नेत्रतपासणी केली. श्री. मुसाद्दिक दाऊद आणि अरविंद बिराजदार यांनी या शिबिराच्या संयोजनात आणि व्यवस्थापनात सिंहाचा वाटा उचलला.

या शिबिरात ज्यांच्या दातांमध्ये काही दोष आढळले त्यांच्यावर सोलापूर डेंटल मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल सात रस्ता, सोलापूर या रुग्णालयात माफक दरात उपचार केले जाणार आहेत तर डोळ्यात दोष आढळलेल्या लोकांवर ब्रिजमोहन फोफलिया नेत्र रुग्णालयात लायन्स क्लब ऑफ सोलापूरच्या मदतीने डोळ्यांचे उपचार केले जाणार आहेत.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी इंचगिरी मठाच्या मठाधिश पुष्पलताताई, निलिमा शितोळे, संपदा जोशी, अनुराधा खारे, सोलापूर सोशल फाउंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील, पल्लवी माने आणि विपुल लावंड यांनी परिश्रम घेतले. या शिबिराच्या उद्घाटन समारंभाला इंचगिरी मठाच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!