---Advertisement---

अ. भा. नाट्य परिषद सोलापूर शाखेच्यावतीन स्व.पद्माकर देव यांना आज अभिवादनाचा कार्यक्रम

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर दि.१७ – सोलापूरच्या नाट्य आणि संगीत क्षेत्रातील अढळ स्थान असलेल्या स्वर्गीय पद्माकर देव यांचा उद्या शनिवारी १८ सप्टेंबर रोजी स्मृतिदिन आहे यानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेच्यावतीने नाट्य परिषदेच्या पद्माकर देव सभागृहात सायंकाळी ६-३० वाजता सांगीतिक अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
स्व.पद्माकर देव सर यांनी संपूर्ण हयातभर नाटय-संगीताची सेवा केली आहे. सोलापूरचे नाट्य व संगीत क्षेत्र समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. म्हणूनच त्यानिमित्त स्व.पद्माकर देव सरांना सांगितीक आदरांजली वाहण्यासाठी, सोलापुरातील ख्यातनाम ज्येष्ठ शास्त्रीय आणि भावगीत गायक प्रशांत देशपांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
त्याच बरोबर ‘श्रीं’ची सायंकाळची महापूजा देशपांडे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आली आहे. तरी रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार आणि प्रमुख कार्यवाह प्रा.ज्योतिबा काटे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!