सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांना लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजकीय रंगेहाथ पकडले आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जाळ्यात अडकले आहेत. २५ हजार रुपयांची लाच घेताना शिक्षणाधिकारी लोहार आणि आणखी एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.
ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी यांच्या प्रकरणात ते राज्यभर चर्चेत आले होते.स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या युडायसवर सही करण्यासाठी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. आज ते स्वीकारताना लाच लुचपत विभागाने त्यांना रांगेहाथ ताब्यात घेतले आहे. चक्क शिक्षणाधिकांऱ्यांनाच लाच घेताना पकडण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट कारभार समोर आला आहे.






