---Advertisement---

अभिनेता विक्कीने केले ‘या’ अभिनेत्रीचे कौतुक !

By team
On: November 24, 2023 2:56 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीपैकी एक असलेल्या जोडी म्हणजे अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे आहेत. हे दोघेही अनेकदा मुलाखतींमध्ये एकमेकांबद्दल भाष्य करताना दिसून येतात. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या एका मुलाखतीत विक्कीने पत्नी कतरिनाचं खूप कौतुक केलं आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये विक्कीला त्याच्या पर्सनल लाईफबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी “कतरिना कैफसोबत स्क्रिप्ट आणि इतर कामाशी संबंधित गोष्टींवर तो घरी चर्चा करतो का?” असा प्रश्न एकाने विक्कीला विचारला. यावर विक्की म्हणाला की, “नाही, एवढ्या कामाची चर्चा होत नाही. स्क्रिप्ट, चित्रपट आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आम्ही दोघे एकाच प्रोफेशनचे आहोत.

पुढे विक्की म्हणाला की, “स्वतःसाठी असा जोडीदार शोधणं खरोखरच एका आशीर्वादासारखे आहे, जिथे आपण घरी परत आल्यासारखे वाटते. मला ते शब्दात कसे मांडायचे हे माहित नाही, परंतु ही एक अतिशय सुखद भावना आहे. कतरिना खूप प्रेमळ व्यक्ती आहे. मला नाही माहित मी हे कसं व्यक्त करू परंतु तिच्यासोबत आयुष्य जगण्यात, जीवनाचा शोध घेण्यात खूप आनंद वाटतो. कतरिना माझ्या आयुष्यात आल्यापासून सर्व काही बदलले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!