---Advertisement---

खेळता खेळता १० वर्षीय चिमुकल्याचा सिमेंटचा पाईपखाली दबून मृत्यू

By team
On: February 5, 2024 10:20 AM
Follow Us:
---Advertisement---

यवतमाळ : वृत्तसंस्था

राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेटचे पीच तयार करण्यासाठी आणलेल्या सिमेंटचा पाईपखाली दबून चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. यात आर्यन जयेश चव्हाण (वय १०) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडसद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या आर्यन हा त्याचे वडील इंदापूर येथील रहिवासी असून आई-वडील ऊस तोडीवर गेले असता त्यांनी मुलाला आपल्या आजी-आजोबाकडे शिक्षणासाठी ठेवले होते. शनिवारी (३ फेब्रुवारी) शाळा सुटल्यानंतर आर्यन आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी शेतशिवारात गेला.

त्याठिकाणी काही तरुणांनी क्रिकेटची पीच तयार करण्यासाठी मोठा सिमेंटचा पाईप आणला. आर्यन आणि त्याचे मित्र या पाईपवर चढून खेळू लागले. दरम्यान, खेळता-खेळता काही मुलांनी सिमेंटचा पाईप ढकलला. त्यामुळे आर्यन धाडकन जमिनीवर कोसळला. काही क्षणातच त्याच्या अंगावरुन सिमेंटचा पाईप गेला.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आर्यनचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मुलांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस तपास करत आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!