---Advertisement---

महिलांनी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे : डॉ.शिवलीला माळी

By team
On: March 9, 2024 9:45 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

महिला सर्व क्षेत्रात पुढे आहेत.प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात आहे असे असताना महिलांनी आपल्या आरोग्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. शिवलीला माळी यांनी केले.जागतिक महिला दिनानिमित्त व महाशिवरात्री निमित्त यंदा प्रथमच टायगर ग्रुप अक्कलकोट आणि अमर शिरसट मित्र परिवाराच्यावतीने महिलांसाठी शक्तीदेवी कार्यालय संजय नगर खासबाग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिलांना फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर  म्हणून पोलीस अधिकारी सीमा कोळी व डॉ. शिवलीला माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.शिवलीला माळी व कोळी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ,त्यागमुर्ती रमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.दोन्ही मान्यवरांचा सत्कार अंजली शिरसट व माहेश्वरी निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर कोळी यांनी उपस्थित महिलांना कायदेविषयक व डॉ. शिवलीला माळी यांनी आरोग्य विषयक मोलाचे मार्गदर्शन करुन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.अंजली शिरसट यांनी आपल्या मनोगतात महिलांचे या देशाकरता या समाजातील असलेले योगदान पटवुन सांगितले.यावर्षी प्रथमच आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आयोजकांच्यावतीने
महाशिवरात्रीनिमित्त उपवास असलेल्या महिलांची सोय देखील करण्यात आली होती.यावेळी महिलांसाठी होमनिस्टर व विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.खेळातील विजेत्यांना विविध प्रकारचे भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्रथमच महिलांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित महिलांनी आयोजक टायगर ग्रुप अक्कलकोट आणि शिरसट मित्रपरिवाराचे आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!