---Advertisement---

अक्कलकोट लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी शिवानंद नंदर्गी तर सचिवपदी माळशेट्टी

By team
On: June 15, 2024 12:43 PM
Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

दि.१४ : येथील नावाजलेली संस्था आंतरराष्ट्रीय संघटना लायन्स क्लब अक्कलकोटच्या २०२४- २५ या वर्षाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वानुमते नूतन अध्यक्षपदी शिवानंद नंदर्गी यांची तर सचिवपदी सुधीर माळशेट्टी यांची निवड करण्यात आली.यात खजिनदारपदी डॉ.सुनील बिरादार यांची  निवड करण्यात आली.

निवडीची बैठक मावळते अध्यक्ष सिद्धया मठ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या निवडीबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष लायन राजेंद्र हत्ते,मल्लिनाथ साखरे,प्रभाकर मजगे आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लायन्स सारख्या मोठ्या संस्थेवर सामाजिक कार्य करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे.

त्यामुळे पुढच्या काळात निश्चितच लायन्सचा गौरव व्हावा अशा पद्धतीचे काम नूतन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होईल, असा विश्वास माळशेट्टी यांनी व्यक्त केला.यावेळी शिवपुत्र हळगोदे,अब्दुलशदिद वळसंगकर , गौरीशंकर चनशेट्टी,डॉ.प्रदीप घिवारे ,अभय खोबरे आदि उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!