---Advertisement---

राज्यात पावसाचा जोर वाढणार ; हवामान विभागाचा अंदाज

By team
On: July 5, 2024 9:20 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, गुरुवार, ४ जुलै रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भातील काही भागांत पावसाने हजेरी लावली.

मान्सूनने संपूर्ण भारत व्यापला आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील अनेक भागांत अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. समुद्रसपाटीवर कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे कोकण घाटमाथ्यावर पाऊस पडत आहे. हवामान विभागाने ५ ते ८ जुलैदरम्यान कोकणातील काही भागात ऑरेंज व यलो अलर्ट दिला आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून, बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!