---Advertisement---

आमदार कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ सोमवारी अमित शहा यांची जाहीर सभा

By team
On: November 16, 2024 2:31 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, वृत्तसंस्था 

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार  सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ सोमवार दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  यांची जाहीर सभा होणार आहे. शहा यांच्या सभेने राज्यातील भाजपच्या प्रचाराची सांगता देखील होणार आहे. या सभेला जिल्ह्यातील भाजप व महायुतीचे प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.

या सभेसाठी भाजप व महायुतीकडून जोरदार तयारी सुरू असून ही सभा बॅगेहळळी रोडवरील शाब्दी फॉर्म हाऊसच्या मागे पटांगणात होणार आहे. या सभेला किमान १५ ते २० हजार भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड व शहराध्यक्ष शिवशरण जोजन यांनी दिली.

याशिवाय दुधनी येथे शनिवारी म्हणजे आज संध्याकाळी ७ वाजता केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची  जाहीर सभा होणार आहे. शहा यांच्या सभेस अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!