श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ ला उत्साहात सुरुवात : छत्रपती संभाजी महाराजांवरील सजीव देखाव्याचे भव्य उद्घाटन
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट श्री तुळजाभवानी माता शारदीय नवरात्र महोत्सव – २०२५ श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने यंदाही श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२५ चे आयोजन करण्यात आले असून, सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील मृत्युंजय सजीव हलता देखाव्याचे शानदार उद्घाटन सोहळा माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. आई राजा उदो उदो…! सदानंदाचा उदो उदो…!, श्री स्वामी समर्थ महाराज कि, जय…! च्या जय घोषाने परिसर दुमदुमून गेला होता. पहिल्याच दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
दरम्यान श्री तुळजाभवानी माता मंदिरात महापूजा, आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम हा विरक्त मठ अक्कलकोटचे श्री म.नि.प्र. बसवलिंग महास्वामीजी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे प.पु.वे.शा.स. अण्णू पुजारी व प.पु. धनंजय महाराज पुजारी, यांच्या दिव्य सानिध्यात तर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, न्यासाचे कायदेविषयक सल्लागार व जेष्ठ विधीज्ञ अॅड. नितीन हबीब, न्यासाचे सनदी लेखापाल ओंकारेश्वर उटगे, न्यासाचे कायदेविषयक सल्लागार व विधीज्ञ अॅड. संतोष खोबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. महिला कलाकारांचा सत्कार न्यासाचे विश्वस्त व हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.अलकाताई जनमेजयराजे भोसले यांचे हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास न्यासाचे विश्वस्त व हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरोहित अप्पू पुजारी यांच्या मंत्रपठणाने पुजा व उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी संजय व सोमकांत कुलकर्णी हे उपस्थित होते.
सदर देखावा हा विजयादशमी पर्यंत सर्व देवी भक्त व शहर वाशीयांसाठी असणार आहे. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावेत असे आवाहन संस्थेचे सचिव शामराव मोरे यांनी केले आहेत.
चौकट- या सजीव हलता देखावा मध्ये पुणे येथील ४५ कलाकारांचा समावेश-संकल्पना-गणेश लोणारे, व्यवस्थापक कुमार मगरे आणि कलाकार निलेश खोमणे, झांबरे मामा, पराग मोहोळकर, संजना यादव, धनश्री, गणेश, राकेश आदि कलाकारांनी सादरीकरण केले.
या प्रसंगी कु.तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु.हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु.स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, लक्ष्मण पाटील, विश्वस्त व पालखी संयोजक संतोष भोसले, मनोज निकम, प्रथमेश इंगळे, सौरभ मोरे, रोहित खोबरे, डॉ.संतोष मेहता, डॉ.आर.व्ही.पाटील, डॉ.प्रदिप घिवारे, डॉ.लिंगराज बोकडे, प्रभाकर मजगे,प्रकाश उन्नद, मल्लिनाथ खुबा, मल्लिकार्जुन मसुती, विठ्ठलराव तेली, नीलकंठ कापसे, शिरीष पंडित, बँक ऑफ इंडियाचे महेश घुटे, अविनाश माने, बँक ऑफ महाराष्ट्राचे किरणकुमार, चंद्रकांत मडीखांबे, बँक ऑफ बडोदाचे नागराज, मोहन हुब्बेळी, मल्लिनाथ स्वामी, दहिटणे सरपंच नितीन मोरे, शिवबा जाधव, बालाजी पाटील, प्रकाश टाके,शरणू कापसे, महेश व्हदलुरे, बसवराज स्वामी, रोहन भागानगरे, नागराज कलबुर्गी, रोहन शिर्के, संजय गोंडाळ, मैनुद्दीन कोरबू, फहीम पिरजादे, ज्ञानेश्वर भोसले, प्रशांत शिंदे, किरण साठे, शिवा मंगरुळे, कल्लप्पा छकडे, सिद्धाराम कल्याणी, सुमित घाटगे, मंगेश सुर्यवंशी, आकाश सुर्यवंशी, भरत राजेगावकर, वैभव मोरे, रोहित मोरे, सुमित कल्याणी, आतिश पवार, योगेश पवार, दत्ता माने, प्रवीण घाटगे, गोटू माने, पिंटू माने, बाळासाहेब पोळ सागर पवार, नामा भोसले, अप्पा हंचाटे, राजेंद्र काटकर, बाबुशा महिंद्रकर, स्वामिनाथ बाबर, सतीश महिंद्रकर, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, तानाजी पाटील, राजू पवार, महांतेश स्वामी, सिद्धराम कल्याणी, बलभीम पवार, प्रकाश माने, आकाश गडकरी, बाळासाहेब घाटगे, समर्थ घाटगे, दर्शन घाटगे, स्वराज घाटगे, मुन्ना महाडिक, धानप्पा उमदी, रोहित कदम, धनंजय निंबाळकर, सोमनाथ सुतार, कल्याण देश्मुख, प्रीतेश किलजे, मुन्ना कोल्हे, पप्पू कोल्हे, आप्पा हंचाटे, महांतेश स्वामी, बाबुशा महिंद्रकर, बिरप्पा व्हनझेंडे, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, विशाल घाटगे यांच्यासह या कार्यक्रमास समस्त विश्वस्त मंडळ, क्रियाशील सदस्य, कार्यकर्ते, व सेवेकरी, अन्नछत्र मंडळाची सहयोगी, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था, अमोलराजे भोसले मित्र मंडळ आदीजण उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार प्रा.शरणप्पा अचलेर सर, अॅड. संतोष खोबरे यांनी केले.
छत्रपतींचा इतिहास
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून श्री स्वामी कार्याबरोबरच विविध समाजउपयोगी कार्य करत असताना नव्या पिढीला छत्रपतींच्या इतिहासाची माहिती व्हावी म्हणून या अगोदर न्यासाने परिसरात शिवचरित्र धातूशिल्प प्रदर्शन हॉल, शिवस्मारक, गड-किल्ले असे उपक्रम सध्या सुरु आहेत, हे बघण्यासाठी रोजची गर्दी वाढत आहे. याबरोबरच शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गतवर्षी नवरात्री मध्ये जाणता राजा युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा दिवशी प्रचंड गर्दी झालेली होती.