ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंबईत मनसेचे कोण जिंकले? विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी एकाच नजरेत

मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा बहुचर्चित निकाल अखेर जाहीर झाला असून, या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या युतीने मोठे यश मिळवत मुंबईवरील आपली पकड अधिक मजबूत केली आहे. दुसरीकडे, ठाकरे बंधूंनी एकत्र येत मोठी राजकीय चाचपणी केली असली तरी त्यांना अपेक्षित यश मिळालेले नाही.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सध्या ५७ उमेदवार आघाडीवर आहेत. तर राज ठाकरे यांच्या मनसेला केवळ ९ जागांवर आघाडी मिळाल्याने हा निकाल मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजप मुंबईत एकतर्फी विजय मिळवेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण काहीसे बदलले होते.

विशेषतः शिवाजी पार्क येथे झालेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभेनंतर निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली होती. निकाल पाहता मराठीबहुल भागांमध्ये ठाकरे बंधूंना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, भाजपने आपल्या पारंपरिक मतदारांसह अमराठी मतदारांचा मजबूत पाठिंबा मिळवत सुमारे ९० च्या आसपास जागांवर आघाडी घेत निर्णायक वर्चस्व सिद्ध केले आहे.

दरम्यान, मनसेसाठी काही दिलासादायक निकालही समोर आले आहेत.
प्रभाग क्रमांक ३८ मधून मनसेच्या सुरेखा परब विजयी झाल्या आहेत.
तर प्रभाग क्रमांक ७४ मधून विद्या आर्या कांगणे यांनी मनसेकडून विजय मिळवला आहे.

एकूणच मुंबई महापालिकेच्या निकालातून भाजप–शिंदे युतीचा दबदबा स्पष्ट दिसत असून, ठाकरे बंधूंची एकत्रित ताकद अपेक्षेइतकी प्रभावी ठरली नसल्याचे या निकालातून अधोरेखित झाले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!