---Advertisement---

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी दयानंद परिचारक; महिला जिल्हाध्यक्षपदी मृणाली शिंदे

By team
On: March 5, 2026 5:14 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर :  प्रतिनिधी

जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हा शाखा सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी कनिष्ठ प्रशासन अधिकारी दयानंद परिचारक यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा उपाध्यक्षपदी विशाल घोगरे कनिष्ठ सहायक व कार्याध्यक्षपदी शिवाजी राठोड कनिष्ठ सहायक तसेच महिला जिल्हाध्यक्षपदी विस्तार अधिकारी (सां) मृणालिनी शिंदे, उपाध्यक्ष श्रीमती सविता काळे परिचर व कार्याध्यक्षपदी स्वाती स्वामी विस्तार अधिकारी (शिक्षण) यांची जिल्हा कार्यकारणी बैठकीत एकमताने निवड करण्यात आली.

सदर निवडपुर्वी स्वर्गीय विवेक लिंगराज सहायक प्रशासन अधिकारी यांच्या फोटोचे पुजन करुन त्यांनी केलेल्या कामकाजाबाबत गैरवोदगार काढण्यात आले.फोटॊ पुजनानंतर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्यध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांचे अध्यक्षतेखाली विसावा सभागृह येथे बैठक घेण्यात येऊन सदर बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडीनंतर पुणे विभागीय संघटक डॉ एस. पी. माने यांनी त्यास मान्यता देऊन नुतन पदाधिकार्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सम्मानित केले उर्वरीत जिल्हा तालुका पदाधिकारी, कार्यकारणी विस्तार लवकरच अध्यक्ष, सचिव यांच्या नेतृत्वाखाली निवडले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस पतसंस्था क्र 1 चे व्हाईस चेअरमन श्रीधर कलशेट्टी,माजी जिल्हाध्यक्ष तजमुल मुतवल्ली, जिल्हा शाखा पदाधिकारी विलास मसलकर,अजय भोसले, राकेश सोडी, संतोष शिंदे, चेतन वाघमारे, श्रीशैल देशमुख, रोहीत घुले,विक्रम शहा,लेखा संघटनेचे अध्यक्ष अनिल बिराजदार,राजगुरु,दत्ता घोडके, कटकधोंड,किरण लालबोंद्रे,मिस्त्री, योगेश हब्बु, योगेश खंडागळे,मठपती,म्हेत्रे,सचिन पवार, गुरव,अभिमन्यु कांबळे, नागेश कोमारी ,माने पंढरपूर तालुक्याचे पदाधिकारी शहाजहान तांबोळी, महेश वैद्य,नितीन शिदे, सतीश ऊनवणे पाटील, कमलेश खाडे, तसेच महिला प्रतिनिधी निर्मला राठोड ,गोदावरी राठोड,आरती माढेकर,राजगुरु मॅडम, व इतर कार्यकारणी सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
निवडी नंतर नूतन जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांनी निःपक्ष, निःस्वार्थ, निर्भिड पणे सर्व कर्मचारी यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येईल तसेच कर्मचाऱ्यांचे हक्क व आत्मसन्मान राखण्यात येईल कै विवेकानंद लिंगराज यांच्या विचाराप्रमाणेच सर्वांचे सहकार्याने कामकाज करू सर्व कर्मचाऱ्यांच्या अडचणी प्रशासनामा समोर मांडू अन्याय झाल्यास प्रशासनाशी भांडू असे मनोगत व्यक्त केले

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!