---Advertisement---

अक्कलकोट-दक्षिण सोलापुरात पॅनल टू पॅनल मतदान होणार; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा विश्वास

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांत सहकार विकास पॅनलला मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे येथे प्रचाराचीही गरज नाही. मतदार पॅनल टू पॅनल मतदान करतील आणि क्रॉस मतदान होणार नाही, असा विश्वास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी लोकापुरे मंगल कार्यालयात भाजप व मित्रपक्ष पुरस्कृत सहकार विकास पॅनलचा प्रचार मेळावा झाला. या मेळाव्याला मतदार आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी माजी आमदार राजन पाटील यांनी पॅनलमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली असून मतदारांनी त्यांना निवडून द्यावे, असे आवाहन केले. सहकार क्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि बँकेची प्रगती साधण्यासाठी सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांना साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या मेळाव्याला माजी आमदार बबनराव शिंदे, दीपक साळुंखे, सुरेश हसापुरे, रणजित शिंदे, दिग्विजय बागल, प्रणव परिचारक, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपसभापती सागर कल्याणशेट्टी उपस्थित होते. तसेच एनटी प्रवर्गाचे उमेदवार राजेंद्र बंदीछोडे, महिला प्रवर्गाच्या उमेदवार अर्चना घाटगे यांच्यासह पॅनलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, अमोल हिप्परगे, अविनाश मडीखांबे, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, सुरेश गड्डी, राजू नागुरे, अप्पासाहेब बिराजदार, सुनील खेड, नन्नू कोरबू, नागराज कुंभार, कांतू धनशेट्टी, अशोक जाधव यांच्यासह कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप पाटील यांनी केले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!