---Advertisement---

अक्कलकोटच्या मायक्रोस्टार कॉम्प्युटरला एमकेसिएल कडुन सर्वात्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान..

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या (एमकेसीएल) वतीने अक्कलकोट येथील मायक्रोस्टार कॉम्प्युटर्सला यंदाही अक्कलकोट तालुक्यातील सर्वोत्तम संगणक प्रशिक्षण संस्थेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत संस्थेला हा सन्मान देण्यात आला.

डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या एमकेसीएलच्या वार्षिक सभेत वरिष्ठ महाव्यवस्थापक अतुल पातोडी, अमित रानडे आणि विभागीय व्यवस्थापक महेश पत्रिके यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक इब्राहिम कारंजे यांनी पुरस्कार स्वीकारला. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन संस्थेचा गौरव करण्यात आला.
गेल्या 25 वर्षांपासून आतापर्यंत २0000 हून अधिक विद्यार्थ्यांनी या संस्थेकडुन संगणक प्रशिक्षण देण्यात आले आहे.

प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीही संस्था प्रयत्नशील आहे. मायक्रोस्टार कॉम्प्युटर ही संस्था अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असते, सारथी आणि अमृत महामंडळाच्या माध्यमातून संबंधित समाजघटकांतील विद्यार्थ्यांना मोफत व्यावसायिक संगणक डिप्लोमा प्रशिक्षण दिले जात आहे.

या यशात विद्यार्थी, पालक, हितचिंतक यांच्यासह संचालिका राहत कारंजे, प्रतिक्षा जाधव, अश्विनी हालोळे, रिजवान जमादार, ज्योतिबा जाधव यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!