ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधीमंडळाचे कार्यालय आता नागपूरलाही सुरू होणार,विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

 

नागपूर,दि.१० : विधीमंडळाच्या कामकाजात सुसूत्रता यावी आणि विदर्भातील आमदार आणि अधिकाऱ्यांची गैरसोय कमी व्हावी यासाठी नागपूर येथे विधीमंडळाचे कार्यालय सुरू होणार आहे, मात्र हे कार्यालय वर्षभरासाठी असेल,असे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते काल नागपूर येथे बोलत होते.राज्य शासनाने या संदर्भातील अध्यादेश काढला असून यासाठी उपसचिव दर्जाचे अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
येत्या दसऱ्यापर्यंत हे कार्यालय सुरू होईल,असेदेखील पटोले यांनी सांगितलं. या निर्णयामुळे विदर्भाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!