---Advertisement---

अविनाश मडिखांबे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

By team
On: July 6, 2024 4:57 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट तालुका आरपीआय(आठवले गट)चे अध्यक्ष अविनाश मढीखांबे यांचे वाढदिवस तालुक्यात विविध उपक्रमांने साजरा करण्यात आला.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले,महिला अध्यक्षा सिमाताई आठवले,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले,जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी आदी पक्ष श्रेष्ठीसह तालुक्यातील मान्यवर आमदार सचिन कल्याणशेट्टी,जेष्ठ नेते आनंद तानवडे,माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी,रासपचे
सुनिल बंडगर,बसवराज सोनकांबळे, महेश हिंडोळे,बाळासाहेब मोरे,आनंदराव सोनकांबळे यांनी शुभेच्छा दिल्या.यानिमित्ताने दुधनी मराठी केंद्र शाळेतील मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप त्याठिकाणच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी दुधनी येथील आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा
झळकी यांनी मडीखांबे यांच्या सामाजिक कार्याची माहिती देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी,
मुस्लीम आघाडिचे,मैहिदीमियाँ जिडगे, दुधनी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जिलानी नाकेदार,हाबुसाब बळुर्गी,आजम शेखजी, गुरू धोडमनी, तिप्पण्णा गोटे,गोस शेखजी,नबीलाल जमादार,मुख्याध्यापक श्रीशैल मलगाण,कोरचगाव,बेणेश्वर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!