---Advertisement---

कामती पोलीस स्टेशन इमारतीचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि १६: मोहोळ तालुक्यातील कामती येथील नवीन पोलीस स्टेशन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रविवारी झाले.

यावेळी आमदार यशवंत माने, समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.

कामती पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना त्वरित न्याय मिळावा, अशी अपेक्षा श्री. भरणे यांनी व्यक्त केली.

यावेळी सभापती अस्लम चौधरी, जि.प. सदस्या शैला गोडसे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवृत्त पोलीस उपअधीक्षक श्री. शिंदे, गणेश वानकर, प्रकाश चवरे, सोलापूर दुध संघाचे संचालक दीपक माळी, पंचायत समिती सदस्य जालिंदर लांडे, माऊली चव्हाण, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल बागल, सचिन देवकर, कामती पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने, अनिल कादे उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!