---Advertisement---

मित्रानेच केली मित्राची हत्या अन मृतदेह पुरला शेतात : सोलापूर जिल्हा हादरला !

By team
On: May 30, 2025 3:05 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सौंदणे गावात एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं आहे. आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाने आपल्या मित्राचा निर्घृण खून करून मृतदेह शेतात गाडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. खून झालेल्या तरुणाचं नाव नेताजी नामदे असून, त्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी विकास मारुती गुरव याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ते २८ मे २०२५ दरम्यान ही घटना घडली. नेताजी दळण आणण्यासाठी गावात गेला होता, मात्र परत न आल्यामुळे वडिलांनी त्याचा बेपत्ता असल्याचा रिपोर्ट दाखल केला. तपासात नेताजीच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप माहिती आणि वडिलांच्या संशयावरून विकास गुरव याला ताब्यात घेण्यात आलं.

चौकशीत विकासने खळबळजनक खुलासा करत सांगितलं की, नेताजीने त्याच्या आईसोबत संबंध ठेवल्याचा संशय त्याला होता, त्यामुळे रागाच्या भरात त्याने नेताजीचा खून केला आणि मृतदेह शेतात पुरून टाकला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला असून, विकास गुरव याला २ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. ही संतापजनक घटना संपूर्ण मोहोळ तालुक्यात चर्चेचा विषय बनली असून, स्थानिकांनी या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!