---Advertisement---

चांदीची मागणी वाढली : १ लाखांचा टप्पा ओलांडला !

By team
On: June 10, 2025 10:53 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था

जगभरातील बाजारात गेल्या काही दिवसापासून चांदीला मोठी मागणी कायम असून अशा परिस्थितीत सोमवारी चांदीचा दर दिल्ली सराफा 1,000 रुपयानी वाढून 1 लाख 8 हजार रुपये प्रती किलो या पातळीवर गेला. दिल्ली सराफात सोन्याचा दर मात्र 280 रुपयांनी कमी होऊन 97,780 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला.

चांदीचा दर एकतर्फे वाढत असल्याबद्दल व्यापार्‍यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर आता गुंतवणूकदार महागाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी चांदीची खरेदी वाढवीत आहेत. कारण सोन्याचा दर अगोदरच उच्च पातळीवर आहे. रशिया -युक्रेन युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था डबघाईला आल्यामुळे अमेरिकेचा डॉलर कमकुवत होत आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जरोख्यातील गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदार सावध झाले आहेत.

यातच इलेक्ट्रिक वाहन, सौरऊर्जा क्षेत्राकडून चांदीची मागणी वाढली आहे. कारण विविध देशात इलेक्ट्रिक वाहन आणि सौरऊर्जा निर्मितीवर अधिक लक्ष दिले जात आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज संस्थेचे विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले की, अमेरिका आणि चीन दरम्यान व्यापार बोलणी सकारात्मक पातळीवर संपुष्टात येईल अशी आशा गुंतवणूकदारांना लागली आहे. तसेच झाले तर सोने आणि चांदीची मागणी कमी होईल. मात्र सध्या तरी चांदीची मागणी कायम असून चांदीचा दर तेरा वर्षाच्या उच्चांकावर असल्याचे दिसून येते. जरी जागतिक तणाव कमी झाला तरी सोन्याची मागणी कमी होईल. मात्र चांदीची मागणी विविध उद्योगाकडून वाढत असल्यामुळे सोन्यापेक्षा चांदीमध्ये सध्या जास्त गुंतवणूक होत असल्याचे वातावरण आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!