---Advertisement---

उदयनराजेंनी थोपटले दंड : आता देव जरी आला…

By team
On: June 22, 2024 9:45 AM
Follow Us:
---Advertisement---

सातारा : वृत्तसंस्था

राज्यातील सातारा मतदार संघ प्रत्येक निवडणुकीत चर्चेचा विषय ठरत असतो, आता पुन्हा एकदा साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी एका कार्यक्रमात बोलतांना दंड थोपटले. कोणी कितीही शड्डू ठोकले, कोणीही येऊ दे, अगदी वरचा देव जरी आला तरी इथे माझा देव महेश शिंदे, शिवेंद्रराजे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे माझ्यासोबत आहेत असे त्यांनी म्हंटले आहे. ते शुक्रवारी साताऱ्यातील कोरेगाव येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलतांना त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत शा‍ब्दिक फटकेबाजी केली. ते म्हणाले, ”आता शिवेंद्रराजे आणि मी एकत्र आलोय. आता मला बघायचे आहे की, जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय करतंय? आता कोणी कितीही शड्डू ठोकले, कोणीही येऊ दे, अगदी वरचा देव जरी आला तरी इथे माझा देव महेश शिंदे, शिवेंद्रराजे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे माझ्यासोबत आहेत. यापुढे मी आणि शिवेंद्रराजे साताऱ्याचे राजकारण करणार आहोत”, असे उदयनराजे म्हणालेत.

यावेळी उदयनराजे भोसले यांनी आपल्या समर्थकांना गाफील न राहण्याचा सल्लाही दिला. उदयनराजे आता निवडून आले म्हणजे सगळे झाले, असे समजू नका. तुम्ही निवांत राहिलात तर मेलाच म्हणून समजा, असे उदयनराजे भोसले म्हणाले आहेत. दरम्यान, साताऱ्यात चुरशीच्या लढाईत उदयनराजे यांचा विजय झाला होता.
सातारा लोकसभा निवडणुकीच्या लढाईत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. या विजयानंतर जलमंदिर पॅलेसमध्ये उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला होता. यावेळी ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. समर्थकांचा जल्लोष पाहता त्यांना अश्रू अनावर झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!