---Advertisement---

सोलापूर बँक निवडणुकीत मोहिते पाटलांची आघाडी; गोरे गटाला धक्का!

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर (वृत्तसंस्था) – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत पहिला निकाल जाहीर झाला असून, मोहिते पाटील गटाने विजयाचे खाते उघडले आहे. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या गटासमोर आव्हान उभे केले आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ९ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत ८६.९४ टक्के मतदान झाले होते. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात या निवडणुकीत थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. पहिल्याच निकालात मोहिते पाटील गटाचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झाले आहेत.

दरम्यान, दुसऱ्या निकालात भाजपप्रणीत सहकार विकास पॅनलने विजय मिळवला आहे. या पॅनलचे उमेदवार आणि सांगोल्याचे शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख विजयी झाले आहेत. त्यांनी मोहिते पाटील पॅनलचे संजय इंगोले यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या निकालांमध्ये दोन्ही गटांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

विजयानंतर अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आपला विजय माळशिरसच्या जनतेला समर्पित केला. तसेच सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले. माळशिरस तालुका हा विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विचारांवर चालणारा असून, सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी येथील जनता एकत्र उभी राहिली आहे. मतदार आपल्याला विजयी करतील, याची खात्री होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मतमोजणी प्रक्रियेवर मोहिते पाटील गटाचा आक्षेप

दुसरीकडे, मतमोजणी प्रक्रियेवरूनही वाद निर्माण झाला आहे. मोहिते पाटील गटाने मतमोजणी प्रक्रियेत एक मतपत्रिका कमी असल्याचा आक्षेप घेतला आहे. दुग्ध प्रक्रिया मतदारसंघातील मतमोजणीदरम्यान हा आक्षेप नोंदवण्यात आला.

विशेष म्हणजे, मतमोजणीच्या पद्धतीवरूनही दोन्ही गटांमध्ये मतभेद होते. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकत्रित मतमोजणीची मागणी केली होती, तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तालुकानिहाय मतमोजणी करण्याची मागणी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे केली होती.

आता उर्वरित जागांचे निकाल काय लागतात आणि या निवडणुकीत कोणत्या गटाला किती जागा मिळतात, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!