---Advertisement---

चपळगांव बीमा ग्राम पुरस्काराने सन्मानित, विमा प्रतिनिधी सुरेश सुरवसे यांचे उल्लेखनीय कार्य !

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२० : एलआयसी विमा कंपनीचे चपळगावचे प्रतिनिधी सुरेश सुरवसे यांच्या उल्लेखनीय कार्याप्रित्यर्थ चपळगावला बीमा ग्राम हा विशेष पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे एलआयसीकडून चपळगावच्या विकासकामांसाठी ५०,०००/- रू.चा प्रोत्साहनपर रक्कमेचा धनादेशदेखील सुपूर्द करण्यात आला.
यावेळी एलआयसी ९५ आर या शाखेचे अधिकारी कृष्णात माने,विकास अधिकारी योगेश धर्माधिकारी,सरपंच उमेश पाटील, सिध्दाराम भंडारकवठे,बसवराज बाणेगांव,महेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सुरेश सुरवसे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.विशेष म्हणजे मिळालेल्या बक्षिसरूपी रक्कमेचा विनीयोग चपळगाव आरोग्य केंद्रात आरओ प्युरीफायर वाॅटर मशिन आणि ग्रामपंचायतीच्या छतावर ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातुन आकाशवाणी व जनजागृतीसाठी उपयोग करणार असल्याचे सरपंच उमेश पाटील यांनी जाहीर केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!