यंदा मोदकचे भाव कडाडले : ४० रुपयापर्यत पोहचले मोदक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात लाडक्या बाप्पाच्या आगमनासोबतच बाप्पाच्या प्रसादात महत्त्वाचे स्थान असलेला मोदक भक्तांना खुणावू लागला आहे. मात्र यंदा मोदकाचे भाव चांगलेच कडाडल्याने मोदक केवळ प्रसाद म्हणूनच खाऊन समाधान मानावे लागणार आहे. नवी मुंबईत काही ठिकाणी मोदकांचा भाव 35 रुपये, तर काही ठिकाणी 40 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तरीही बाप्पासाठी मोदकांची आगाऊ मागणी नोंदवली जात आहे. … Read more

पहिल्यांदाच शिवतीर्थावर उद्धव ठाकरे दाखल : बाप्पांना घातले साकडे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई तसेच पुण्यात गणपती बाप्पांचे विशेष आकर्षण आहे. मुंबईतील लालबागचा राजा असो किंवा श्री सिद्धिविनायक असो राज्यभरातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. राजकीय वर्तुळात देखील गणेशोत्सवानिमित्त एकमेकांच्या घरी बाप्पांचे दर्शन घ्यायला जातात तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव … Read more

यंदा अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाची धूम ; पूजेसाठी सर्वोत्तम मुहूर्त

 मुंबई : वृत्तसंस्था आज सर्वत्र बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष होत आहे. बुधवारी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५३ पर्यंत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्हानंतर देखील करता येऊ शकते. विशेष म्हणजे यंदाचा गणेशोत्सव हा दहा नव्हे, तर अकरा दिवसांचा असणार आहे, अशी माहिती दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली. ज्या गणेशाचे आवाहन … Read more

गणेशभक्तांसाठी खुशखबर : सात दिवस ध्वनिक्षेपक वापरास मान्यता !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करून गणेशोत्सवादरम्यान सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सात दिवस ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धकांचा वापर करण्यास परवानगी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे. ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास … Read more

शंकर म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त देवस्थानच्यावतीने सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शिवसेना (शिंदे गट) गटाचे नेते शंकर म्हेत्रे यांचा वाढदिवस यंदा विशेष पद्धतीने साजरा झाला. यानिमित्ताने अक्कलकोटमधील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते शंकर म्हेत्रे यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शंकर म्हेत्रे यांना श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, श्रीफळ व पुष्पगुच्छ अर्पण करून सत्कार करण्यात आला. प्रथमेश इंगळे यांनीही या … Read more

अक्कलकोटमध्ये २८ ऑगस्टपासून गणेशोत्सव व्याख्यानमाला

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी गणेशोत्सव म्हणजे केवळ पूजा-अर्चा किंवा सांस्कृतिक सोहळाच नव्हे तर विचारांचे, संस्कृतीचे आणि ज्ञानाचेही पर्व आहे. या जाणिवेतूनच विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोट दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्याख्यानमाला आयोजित करत असते. यंदाही प्रतिष्ठानने सलग १४ व्या वर्षी हा उपक्रम राबवित असून गुरुवार, २८ ऑगस्ट ते बुधवार, ३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सात दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात … Read more

नो डीजे, नो डॉल्बी-पर्यावरणपूरक आणि शांततेचा सण साजरा करूया ; अक्कलकोटमध्ये पोलिसांची मोठी तयारी!

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीमध्ये येत्या काही दिवसांत गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन महत्वाचे सण साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सण शांततेत पार पडावेत, तसेच कोणत्याही प्रकारचा जातीय वा धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी दिनांक २५ ऑगस्ट २०२८ रोजी प्रियदर्शनी मंगल कार्यालय, कमलाराजे चौक, अक्कलकोट येथे … Read more

“मानवतेचा अद्वितीय संदेश: मुस्लिम तरुण खानने संत प्रेमानंद महाराजांसाठी किडनीदानाची केली तयारी”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील इटारसी येथील रहिवासी असलेल्या आरिफ खान चिश्ती या मुस्लीम तरुणाने संत प्रेमानंद महाराज यांना आपली किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आरिफने संत प्रेमानंद महाराजांना पत्र लिहून आपली भावना मांडली असून, या निर्णयामुळे सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. आरिफ खान चिश्ती हा इटारसी (नर्मदापुरम, … Read more

भाविकाची श्रद्धा : तिरुपती बालाजीच्या चरणी तब्बल इतके किलो सोने दान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यापैकी अनेकजण त्यांच्या श्रद्धेनुसार मंदिरात दान देतात. यामध्ये उद्योगपतीपासून ते सामान्य भक्तंपर्यंत सर्वांचा समावेश असतो. अशातच एका भाविकाने अलीकडेच तिरुपती बालाजीच्या चरणी तब्बल 121 किलो सोने दान केले आहे. या सोन्याची किमत जवळपास 140 कोटी रुपये असल्याचे सांगितले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री … Read more

पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल : “भ्रष्टाचारी तुरुंगात तर जाईलच पण खुर्चीही गमवावी लागेल… !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिहारमधील गया याठिकाणी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान मोदी यांनी आज केली. त्यानंतर पंतप्रधानांनी एका जाहीर सभेला संबोधित करत विरोधकांवर, विशेषतः राजद आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकारच्या नवीन प्रस्तावित कायद्याचाही उल्लेख केला, ज्या अंतर्गत, जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री गंभीर गुन्हेगारी आरोपांवर ३० दिवसांपेक्षा जास्त … Read more

Don`t copy text!