---Advertisement---

धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात : सेल्फीच्या नादात एक जागीच ठार

By team
On: July 6, 2024 4:48 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरु असतांना अनेक ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांचा जीव गेल्याच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच बीडमध्ये देखील अशीच एक धक्कादाय घटना घडली आहे. या थरारक अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. सेल्फीचा हाच नाद कधीकधी जीवघेणा ठरू शकतो त्याची प्रचिती या व्हिडिओवरून येत आहे.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, दुकाचीकवरून प्रवास करत असताना एका व्यक्तीने रील काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही वेळातच अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जण गंभीर जखमी आहे. धुळे- सोलापूर महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवर मागे बसलेला तुरण सेल्फी कॅमेऱ्याच्या माध्यमातून रिल काढत होता. बाईक वेगात चाललेली असताना तो मागे वळून पाहून कॅमेऱ्याला बोटांनी व्हिक्टरी साईन दाखवत होता. विशेष म्हणजे बाईक चालवत असलेला तरुण देखील रिल तयार करण्यासाठी फोनमध्ये बघण्याचा प्रयत्न करत होता. यावेळीच त्यांचा अपघात झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!