---Advertisement---

ठाकरेंनी केली पाहणी : ‘या’ दिवशी होणार बाळासाहेबांच्या स्मारकाचे लोकार्पण

By team
On: June 18, 2024 3:20 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीची धामधूम झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून दादरमधील महापौर निवासस्थानाच्या जागेत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाच्या कामाची शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. त्यानंतर हे काम कधी पूर्ण होईल अन् स्मारक राज्यातील जनतेसाठी कधी सुरु होणार? त्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक पुढील वर्षी २३ जानेवारी रोजी जनतेसाठी खुले करण्याचा प्रयत्न असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच स्मारकाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे गेल्या तीन महिने स्मारकाकडे येता आले नाही. परंतु या तीन महिन्यांत कामाची चांगली प्रगती झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, स्मारकाचे बांधकाम जवळपास जवळपास पूर्ण झाले आहे. त्यानंतर खरे काम सुरु होणार आहे. इंटरिअरचे हे काम असणार आहे. त्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्ण जीवनप्रवास देण्यात येणार आहे. आमचा प्रयत्न २३ जानेवारी २०२५ पर्यंत हे स्मारक जनतेसाठी आणि शिवसैनिकांसाठी खुले करावे.
बाळासाहेबांचे स्मारक असलेल्या जागेजवळ समुद्र आहे. त्यामुळे पाण्याचा रेटा प्रचंड येत असतो. त्या अडचणींवर मात करत काम झाले आहे. अजून काही बारीक सारीक गोष्टी अपूर्ण आहेत. त्या पूर्ण करण्यात येणार आहे. परंतु स्मारकाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. स्मारकाचे काम दोन टप्प्यात होत आहे. पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थानाचे वारसा जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे संग्रहालय बांधण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!