---Advertisement---

म्हणूनच तुम्ही BEST CM …. मनसे नेते संदीप देशपांडे यांचा उपरोधिक टोला

Follow Us:
---Advertisement---

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमदार नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले होते. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांचा आम्हाला अभिमान असून चक्रीवादळाला लाजवेल असाच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा वेग होता, असे म्हणत मुख्यमंत्र्यांचा बेस्ट मुख्यमंत्री असा उपरोधिक टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे आपल्या ट्विटमध्ये असे म्हंटले आहे की, मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरच BEST C M.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!