---Advertisement---

मुख्य कार्यकारी अधिकारी दवाखान्यात असले तरी कामकाजावर पूर्ण लक्ष

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर,दि.९ : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांच्यावर सध्या सोलापुरात उपचार सुरु आहेत.मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. असे असले तरी त्यांनी मोबाईलद्वारे ‘वर्क फ्रॉम हॉस्पीटल’ सुरु ठेवले आहे.

मार्च महिना असल्याने प्रशासकीय कामकाजात वेग आणावा लागतो. विशेष करुन निधी खर्ची टाकण्यासाठी हा महिना प्रशासकीय दृष्टीने महत्वाचा आहे. जिल्हा नियोजन समितीकडून आलेला निधी शंभर टक्के खर्ची करण्यासाठी रोजच्या रोज त्यांंच्या सर्व विभाग प्रमुखांना सुचना असतात. कोेरोनाचा वाढता संसर्ग पाहता पालक अधिकार्‍यांच्या कामावर त्यांची नजर आहे. सर्व गटविकास अधिकार्‍यांनी शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करणे, रोजच्या रोज आढावा घेणे, कॉन्टॅक्ट ट्रेसींग वाढवणे, अशा सूचनांसह व्यवस्थीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश स्वामी यांनी दिले आहेत.

आपल्या अनुपस्थितीत मुख्यालयात सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी हे आपल्या जागेवर आहेत का नाही? यासाठी त्यांनी आता सी.सी.टी.व्ही. फुटेजची लिंक आपल्या मोबाईलवर मागवून घेतली आहेे.ते सध्या जरी उपचार घेत असले तरी त्यांचे पूर्ण लक्ष कामकाजावर आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!