---Advertisement---

मराठा मोर्चात प्रकाश आंबेडकर घेणार सहभाग; आंबेडकर कोल्हापूरात दाखल

Follow Us:
---Advertisement---

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याच राजकारणात आपला आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात उद्या कोल्हापुरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात निघणारा मोर्चा हा पहिला मराठा मोर्चा ठरणार आहे.

कोल्हापूरातील उद्याच्या मराठा मूक मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार आहेत अशी माहिती वंचित बहुजन आघाडीने ट्विटरवर ट्विट करून माहिती दिली आहे.

या मूक मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे आजच कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार छत्रपती संभाजीराजे हे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती त्या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीराजेंना पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते त्यानुसार प्रकाश आंबेडकर उद्या आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!