---Advertisement---

कार व रुग्णवाहिकेच्या अपघातात डॉक्टरचा दुर्देवी मृत्यू

By team
On: December 1, 2023 9:08 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

माळशीरस तालुक्यातील सातारा-लातूर महामार्गावर गारवाड पाटी (ता. माळशिरस) येथे रुग्णवाहिका व टोयाटा कार यांची धडक होऊन डॉ. वसंत भोसले (वय ३५, रा. अकलुज) यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड येथून एका रुग्ण बालकाला घेऊन रुग्णवाहिका (क्र. एमएच ११ सी एच ९३२४) ही अकलूजच्या दिशेने निघाली असता गारवाड पाटी येथे मांडकीहून अकलुजकडे निघालेली टोयाटा कार यांची जोरदार धडक झाली. या धडकेत कार चालक डॉ. वसंत भोसले हे गंभीर जखमी झाले. त्यांना अकलुज येथील अश्विनी हॉस्पीटल येथे नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात टोयाटा कारचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत माळशिरस पोलिसात खबर देण्यात आली आहे. डॉ. वसंत भोसले हे प्राथमिक आरोग्य केंद्र मांडकी येथे कार्यरत होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!