ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

रील बनवणे तरुणांना पडले महागात ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याची इच्छा माणसाला काय करायला लावत नाही? सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याच्या हव्यासापोटी लोकं रोजच कायद्याचे उल्लंघन करून रील्स बनवायला मागेपुढे पाहत नाहीत, तर कधी रस्त्याच्या मधोमध स्टंट…

भयंकर : प्रेमी युगुलास निर्वस्त्र करीत लुटले

बारामती : वृत्तसंस्था अरे चाललंय तरी काय.... प्रेमी युगुलास अडवून मारहाण केली आणि अंगावरून ९० हजारांचे दागिने काढून घेत नग्न करून फोटो काढण्याचा प्रकार बारामती येथील विमानतळानजीक घडला. आतापर्यंत प्रकारच्या दोन घटना घडल्या असून, त्यातील…

भरदुपारी पहिलवानाची निघृण हत्या

नाशिक : वृत्तसंस्था इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील भूषण दिनकर लहामगे या पहिलवानाची अज्ञात मारेकऱ्यांनी शुक्रवारी भरदुपारी मुंबई-आग्रा महामार्गावर कोयत्याने वार केल्यानंतर गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलीस…

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

पुणे : वृत्तसंस्था अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सचिन अणदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना 5…

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज निकाल

पुणे : वृत्तसंस्था अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रकरणाची हत्या सुनावणी पूर्ण झाली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात यावर सुनावणी सुरू होती. ती पूर्ण झाल्याने शुक्रवारी (दि. १०) याप्रकरणी निकाल लागणार…

दोन मुलींचा खून करीत आईने संपविली जीवनयात्रा

नाशिक : वृत्तसंस्था पतीच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या लहानग्या मुलींना विष देत गळा आवळून ठार केले व नंतर स्वतःही इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अश्विनी स्वप्निल निकुंभ (३०, रा. कोणार्कनगर)…

भिशीच्या पैशांचा वाद : महिलेसह पाच मुलांचे अपहरण

छत्रपती संभाजीनगर :  जिल्ह्यातील चितेगाव येथे भिशीच्या पैशांच्या वादातून महिलेसह तिच्या पाच मुलांचे अपहरण केल्याची घटना ६ मे रोजी पैठण तालुक्यातील चितेगावमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली असून, त्यांची न्यायालयीन कोठडीत…

गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट : 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागातील रोशन मशिदीजवळील गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. स्वयंपाक करताना गॅसचा भडका झाला आणि सिलिंडरचा…

जादूटोण्याच्या संशय : दोघांना जिवंत जाळले

गडचिरोली : वृत्तसंस्था एका घरात लागोपाठ होणाऱ्या मृत्युसत्रास जबाबदार धरून पुजारी म्हणून काम करणाऱ्या महिलेसह पुरुषास जिवंत जाळून ठार केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील बारसेवाडा येथे शुक्रवारी उघडकीस आली. पोलिसांनी १५ आरोपींना जेरबंद…

किरकाेळ कारणावरून जवानाची निर्घृण हत्या

परभणी : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात किरकाेळ कारणावरून हॉटेल मालकाशी झालेल्या वादातून महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या एका जवानाची निर्घृणपणे हत्या झाल्याची…
Don`t copy text!